Posted inLyrics in Marathi
mitha pithacha jogwa lyrics in marathi
मिठा पीठाचा जोगवा, चलग सयांनो दरबारी मला जायचंय दूरवरी बाई नांदूरगडच्या बाजारी, नांदुरगडला जाईन हिरवा चुडा घेईन, आईला चुडा भरीन लवकर परत येईन बाई, लवकर परत येईन ॥१॥
मला जायचंय दूरवरी बाई, पंढरपुरच्या बाजारी पंढरपुरला जाईन वरण पुरण करीन विठाईला नैवेद्य दाविन लवकर परत येईन बाई लवकर परत येईन ॥२॥
चल ग सयांनो दरबारी, मला जायचंय दूरवरी बाई आळंदीच्या बाजारी, आळंदीला जाईन हार बुक्का वाहीन, एका जनार्दनी जाईन माय माऊली भेटेन लवकर परत येईन बाई लवकर परत येईन ॥३॥